नूतन गुजराती समाजाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करुन नागरिकांचे लसीकरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नूतन गुजराती समाजाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करुन नागरिकांचे लसीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)-  नवरात्रोत्सवात नूतन गुजराती समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात होणारा गरबा-दांडियारासच्या कार्यक्रमाला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीव

Sangamner : प्रत्येक नागरिकाने कोविड लस घ्यावी
बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी… नावनोंदणी करण्याची गरज
Ahmednagar : नगरमध्ये मंदिरातील पुजारीच फैलावतात कोरोना (Video)

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

नवरात्रोत्सवात नूतन गुजराती समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात होणारा गरबा-दांडियारासच्या कार्यक्रमाला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फाटा देऊन रक्तदान व कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकी जपत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन नूतन गुजराती समाजाने एक आदर्श ठेवला.

टिळक रोड, पटेलवाडी येथे नूतन गुजराती समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान व कोरोना लसीकरण शिबीराचे उद्घाटन उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, वैद्यकिय अधिकारी डॉ. आएशा शेख, समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तमभाई पटेल, खजिनदार जेठाभाई पटेल, विश्‍वस्त खिंमजी पटेल, जिग्नेश सोळंकी, विपुल शहा, राजू पटेल, हिरालाल पटेल, चिराग शहा, वसंत शहा, प्रविणभाई मेहेता आदी समाजबांधव उपस्थित होते.  

उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, कोरोना महामारीत मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी रक्तदानाची गरज आहे. रक्तदान ही काळाची गरज बनली असून, सामाजिक बांधिलकी जोपासत प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. तर कोरोनामुक्तीसाठी लसीकरण अत्यावश्यक आहे. शहरात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. तर नूतन गुजराती समाजाने राबविलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.  

उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी धार्मिक कार्यक्रमांना सामाजिक उपक्रमाची जोड दिल्यास बदल घडणार आहे. नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी नागरिकांपर्यंत लस घेऊन जाण्याचा उपक्रम महापालिकेच्या वतीने सुरु आहे. लसीकरणासाठी सर्व समाजाने पुढे येण्याची गरज आहे.  कोरोना महामारीशी लढा सुरु असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तासाठी मनुष्य मनुष्यावर अवलंबून असून, प्रत्येकाने रक्तदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.

प्रास्ताविकात विपुल शहा यांनी नूतन गुजराती समाज दरवर्षी पटेलवाडी येथे गरबा-दांडियारासचा पारंपारिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेत असतो. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी हा कार्यक्रम रद्द करुन रक्तदान करण्यात आले होते. यावर्षी देखील रक्तदान करुन समाज बांधवांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तमभाई पटेल यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी शुभांगी पटेकर व मोहिनी दिकोंडा यांनी परिश्रम घेतले. तर जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. याप्रसंगी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

COMMENTS