Homeताज्या बातम्या

मरडगा येथे २२ जून रोजी तुकामाई पुण्यतिथीनिमित्त भव्य महाप्रसाद; शिवपुराण कथा व ज्ञानेश्वरी पारायणाने परिसर भक्तीमय

तामसा : हदगाव तालुक्यातील मरडगा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुकामाई पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

११ वी प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळामुळे पालक हतबल; ऑनलाईन साईट ठप्प, नेट कॅफे चालकांकडून लूट
नागपुरात गॅरेजला भीषण आग; चार वाहने जळून खाक, १५ लाखांचे नुकसान
मोफत गणवेश योजनेत महत्त्वपूर्ण बदल; १०० टक्के पॉलिस्टर कापडावर बंदी

तामसा : हदगाव तालुक्यातील मरडगा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुकामाई पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ जून २०२६ पासून शिवपुराण कथा व ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ झाला असून ह.भ.प. परमेश्वर दीदी यांच्या रसाळ वाणीतून शिवपुराण कथामृताचा लाभ भाविकांना मिळत आहे.

तसेच विविध भागांतून आलेले कीर्तनकार महाराज सात दिवस कीर्तनसेवा देत समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या ओजस्वी वाणीतून गावकरी व परिसरातील भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ होत आहे. या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर दुपारी ३ वाजल्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

परिसरातील सर्वांत मोठ्या महापंगतींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुण्यतिथी सोहळ्यास दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतात. यावर्षीही अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तुकामाई उत्सव समिती व मरडगा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS