Homeताज्या बातम्या

मुखेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; बेपत्ता महिलेच्या अंध खूनप्रकरणाचा महिनाभरात उलगडा, दोन आरोपी अटकेत

नांदेड : मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बेपत्ता महिलेच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अवघ्या महिनाभरात अंध खूनप्रकरणाचा उलगडा करून दोन आ

‘एसएसजीएम’च्या सहा विद्यार्थ्यांची रिसर्च असोसिएटसाठी निवड; कोपरगाव महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राइव्ह
स्व. विखे पाटलांचे दुष्काळमुक्तीचे स्वप्न ना. राधाकृष्ण विखेंनी पूर्ण करावे; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्रतिपादन
धनादेश अनादरप्रकरणी आरोपीस कारावास व दंडाची शिक्षा; अहिल्यानगर न्यायालयाचा निर्णय

नांदेड : मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बेपत्ता महिलेच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अवघ्या महिनाभरात अंध खूनप्रकरणाचा उलगडा करून दोन आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स (सीडीआर) तसेच साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, मरखेल पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, देवशाला लक्ष्मीकांत गोनोरे (वय ४०, रा. उमरामपूर, ता. देगलूर, जि. नांदेड) या २५ एप्रिल २०२६ रोजी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत १७ मे २०२६ रोजी मरखेल पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळाची पाहणी तसेच साक्षीदारांच्या जबाबांचे बारकाईने विश्लेषण केले. तपासादरम्यान मृत महिलेचा संपर्क संपत चव्हाण (वय ४५, रा. आबापूर, ता. देगलूर) याच्याशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिलेचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात उघड झाले. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून, डीएनए तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३, २३८ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास मरखेल पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक तसेच मुखेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मरखेल पोलीस ठाण्याचे अधिकारी व तपास पथकाने केली. अल्पावधीत अंध खूनप्रकरणाचा उलगडा करून आरोपींना गजाआड करण्यात यश मिळाल्याने मुखेड पोलिसांच्या तपासकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS