महिला रुग्णांसाठी महिला डॉक्टरांची स्वतंत्र टीम; औषधोपचारात विशेष सवलत बीड | प्रतिनिधी : शहरातील नामांकित 'सुश्रुत मूळव्याध व भगंदर सुपर स्पेश

महिला रुग्णांसाठी महिला डॉक्टरांची स्वतंत्र टीम; औषधोपचारात विशेष सवलत
बीड | प्रतिनिधी : शहरातील नामांकित ‘सुश्रुत मूळव्याध व भगंदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’च्या वतीने येत्या शुक्रवार, दिनांक १९ जून २०२६ रोजी भव्य मोफत मूळव्याध, भगंदर आणि फिशर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रख्यात मूळव्याध तज्ज्ञ डॉ. अमोल खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न होणार आहे.
अनेकदा महिला रुग्ण संकोच किंवा भीतीपोटी या आजारांची लक्षणे लपवून ठेवतात. हीच बाब लक्षात घेऊन, शिबिरात महिला रुग्णांची तपासणी महिला मूळव्याध तज्ज्ञ डॉ. शिल्पा खेत्रे व त्यांच्या टीममार्फतच केली जाणार आहे, जेणेकरून महिलांना न संकोचता उपचार घेता येतील. हे शिबिर शुक्रवार रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘द्वारकानंद हॉस्पिटल शेजारी, प्रदीप गॅस ऑफिस समोर, राऊत मळा, माळीवेस रोड, बीड’ येथील सुश्रुत मूळव्याध व भगंदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे होईल.
शौचाच्या वेळी रक्त पडणे, तीव्र वेदना होणे किंवा गाठ येणे ही मूळव्याधाची प्राथमिक लक्षणे आहेत. भीती किंवा लाजेपोटी याकडे दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर रूप धारण करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी वेळेत निदान करून घ्यावे, असे आवाहन डॉ. अमोल खेत्रे यांनी केले आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना उपचारात विशेष सवलत दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी ८६००२८७९७२ किंवा ७५१७७४७९७२ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन सुश्रुत हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS