Homeव्हिडीओ

महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

https://youtu.be/2sgZW_nG71I जळगाव जामोद, संग्रामपूर व मलकापूर परिसरातील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी त्रस्त असून, कमी क्षमतेचे ट्रान्स

राजकीय नेते की खरातच्या भोंदूगिरीचे पाठीराखे?; माकपाचा सरकारवर ‘हल्लाबोल’!
स्नेहल आहेरचे एमपीएसीत यश 
दिंडोरीत ACB ची मोठी कारवाई! वेतनश्रेणीच्या बिलासाठी लाचेची मागणी!

जळगाव जामोद, संग्रामपूर व मलकापूर परिसरातील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी त्रस्त असून, कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर वारंवार जळणे आणि दिवसा वीज न मिळणे यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यातच तब्बल २०० किलोमीटरच्या वीज तारा चोरीला गेल्या असून, शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी व केबल चोरीला जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. या संघटित गुन्हेगारीचा त्वरित तपास करून चोरांवर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी गृहविभागाकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या वीज आणि सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रसेनजीत पाटील यांनी दिला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहराध्यक्ष इरफान खान, आशिष वायझोडे इत्यादींची उपस्थिती होती

COMMENTS