Homeताज्या बातम्या

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महावितरण कर्मचार्‍यांकडून शेख अमीर मदनी यांचा सत्कार

बीड : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ बीड कामगार कल्याण केंद्राचे

बीड जिल्हा शिवसेनेला मिळाला तरुण तडफदार चेहरा!इरफान कुरेशी यांची शिवसेना अल्पसंख्याक आघाडी जिल्हाप्रमुखपदी निवड
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यकपदी निवडप्रज्ञा जाधव-आठवले यांचा नागसेन बुद्धविहारात सत्कार
तौहिद खान हत्याकांडामुळे परळीत संताप; व्हायरल ऑडिओची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणीअल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीचे पोलीस अधीक्षक कार्यालयास निवेदन

बीड : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ बीड कामगार कल्याण केंद्राचे सभासद तथा महावितरणचे कर्मचारी श्री. शेख अमीर मदनी शेख जलील यांना जाहीर झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महावितरणच्या सहकार्‍यांनी एकत्र येत त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेख अमीर मदनी यांच्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा आणि कामातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराची घोषणा होताच महावितरण विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सहकार्‍यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

यावेळी शुभेच्छा देण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्री. शेख एजास (प्रधान तंत्रज्ञ, गेवराई महावितरण), श्री. अस्वलिंग बरे, श्री. महेश नवपुते, श्री. रजनीकांत तागड, श्री. दत्ता माठे, श्री. गजानन साळुंके यांच्यासह इतर सहकार्‍यांचा समावेश होता. उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन शेख अमीर मदनी यांचा गौरव केला. आपल्या सहकार्‍याला राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार मिळाल्याने गेवराई व बीड महावितरण विभागात त्यांचे कौतुक होत आहे.

COMMENTS