Homeताज्या बातम्या

तांभेरे येथे ‘खेत बचाव’ अभियान प्रशिक्षण संपन्न

सोयाबीन व तूर उत्पादन तंत्रज्ञानाची दिली माहिती देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) यांच्या 'शेतकरी प्रथम प्रकल्प' आणि कृषी

जामीनदारांच्या सातबाऱ्यावर एक लाखांचा बोजा; अवैध दारू विक्रेत्यांना पाठबळ देणाऱ्यांवर राहुरी पोलिसांची धडक कारवाई
राहुरी गोळीबार प्रकरणातील आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद; मुळा धरण परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
सासरच्या छळाला कंटाळून देवळाली प्रवरा येथील विवाहितेची पुण्यात आत्महत्या; पतीसह दोघे गजाआड

सोयाबीन व तूर उत्पादन तंत्रज्ञानाची दिली माहिती

देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) यांच्या ‘शेतकरी प्रथम प्रकल्प’ आणि कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेत बचाव अभियान’ व ‘संतुलित खत वापर जनजागृती अभियाना’ंतर्गत तांभेरे येथे सोयाबीन व तूर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्लीस्थित भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (ICAR) शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत हा उपयुक्त उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माती परीक्षण व पीक परीक्षा प्रकल्पाचे मृदा रसायनशास्त्रज्ञ डॉ. आनंद जाधव होते. तर तांभेरेचे सरपंच डॉ. उमेश मुसमाडे, प्रमुख समन्वयक डॉ. सचिन सदाफळ, सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख यांच्यासह कृषी शास्त्रज्ञ प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. आनंद जाधव यांनी मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय, जैविक व हिरवळीच्या खतांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढविणे अत्यंत आवश्यक असून शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच संतुलित रासायनिक खतांचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात डॉ. सचिन सदाफळ यांनी ‘कृषी तंत्रज्ञान घरोघरी, समृद्धी येईल गावोगावी’ या संकल्पनेतून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात असल्याचे सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमास चिंचविहिरे, कणगर, तांभेरे आणि कानडगाव परिसरातील १०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS