'प्रवेशोत्सव' सोहळा संपन्न कोपरगाव : येथील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने नवप्रवेशित विद्यार्थिन

‘प्रवेशोत्सव’ सोहळा संपन्न
कोपरगाव : येथील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने नवप्रवेशित विद्यार्थिनींचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. या विशेष प्रसंगी शाळेचा संपूर्ण परिसर विविध रंगबेरंगी फुले, फुगे आणि आकर्षक रांगोळ्या काढून सजविण्यात आला होता.
या ‘प्रवेशोत्सव’ कार्यक्रमास विद्यालयाच्या स्थानिक शालेय समितीच्या सदस्या स्वप्नजाताई वाबळे, सदस्य वसंतराव कपिले, सुशीलकुमार अरोरा, अध्यक्ष युसूफ भाई रंगरेज, शिक्षक-पालक संघाच्या सहसचिव अर्चना औताडे, प्राचार्या अनिता धनक, उपमुख्याध्यापिका उज्वला म्हस्के, पर्यवेक्षिका सुनीता पवार आणि पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन विद्यार्थिनींना गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना स्वप्नजाताई वाबळे म्हणाल्या की, विद्यार्थिनींनी भरपूर अभ्यास करण्यासोबतच स्वतःचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच विविध मैदानी खेळ खेळून आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे. वसंतराव कपिले यांनी विद्यार्थिनींना उत्तम गुणवत्ता प्राप्त करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक करताना प्राचार्या अनिता धनक यांनी स्पष्ट केले की, शाळेतील पहिला दिवस दडपणमुक्त आणि आनंददायी असावा, याच उद्देशाने विद्यालयात हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS