Homeताज्या बातम्या

पाथर्डीच्या बाबूजी आव्हाड महाविद्यालयाची सुवर्ण परंपरा कायम; तब्बल ९४ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड

पाथर्डी : येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातही आपले विद्यार्थी शासकीय सेवेत भरती करण्याची सुवर्ण परंपरा यशस्वीरित्य

चालुक्य वंशजांनी एकाच छत्राखाली यावे; भोर येथील सोनवणे परिवार स्नेह मेळाव्यात दीपक साळुंखे यांचे प्रतिपादन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य प्रेरणादायी; प्रा. टी. ई. शेळके यांचे प्रतिपादन
आश्वी बुद्रुक येथे प्रवरेच्या कृषीदूतांचे उत्साहात स्वागत; शेतकऱ्यांना करणार आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
बाबूजी आव्हाड महाविद्यालय

पाथर्डी : येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातही आपले विद्यार्थी शासकीय सेवेत भरती करण्याची सुवर्ण परंपरा यशस्वीरित्या कायम राखली आहे. या वर्षी महाविद्यालयातील तब्बल ९४ विद्यार्थ्यांची पोलीस, आर्मी तसेच इतर शासकीय सेवांमध्ये निवड झाली आहे.

गेल्या १५ वर्षांत महाविद्यालयातील ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ‘करिअर कट्टा’ आणि भव्य क्रीडांगणाचा प्रभावी वापर करून तब्बल ५००० पेक्षा जास्त विद्यार्थी पोलीस दल, लष्कर (आर्मी), एमपीएससी (MPSC) व इतर शासकीय सेवांमध्ये दाखल झाले आहेत. यावर्षी महाविद्यालयातील ५६ विद्यार्थी पोलीस व खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत, ३१ विद्यार्थी भारतीय सैन्यदलात, ५ विद्यार्थी विविध शासकीय आस्थापनांमध्ये तर २ विद्यार्थी सेट-नेट (SET-NET) परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

“स्पर्धा परीक्षा केंद्र आणि भव्य क्रीडांगणाच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत व योग्य मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे दरवर्षी विद्यार्थी मोठे यश मिळवत आहेत,” असे प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी सांगितले.

“महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्ये आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवांमध्ये रोजगाराची संधी मिळावी, हाच आमचा उद्देश आहे.” – अभय आव्हाड (अध्यक्ष, पार्थ विद्या प्रसारक मंडळ)

COMMENTS