कुंडलवाडी : कुंडलवाडी शहर व परिसरात एअरटेल (Airtel) मोबाईल नेटवर्कची सेवा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांना मोठ्या अड

कुंडलवाडी : कुंडलवाडी शहर व परिसरात एअरटेल (Airtel) मोबाईल नेटवर्कची सेवा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कॉलिंग, इंटरनेट सेवा तसेच ऑनलाइन व्यवहारांमध्ये सतत अडथळे निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ग्राहकांच्या तक्रारींनुसार, एअरटेल कंपनीने अलीकडील काळात मोबाईल रिचार्जच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. मात्र, वाढीव शुल्क आकारूनही ग्राहकांना दर्जेदार नेटवर्क सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे. नेटवर्क वारंवार गायब होत असल्याने महत्त्वाचे फोन कॉल्स तुटणे, ऑनलाइन कामे रखडणे तसेच विद्यार्थी आणि स्थानिक व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
विशेष म्हणजे, कुंडलवाडी शहरात एअरटेलचे कोणतेही स्थानिक कार्यालय किंवा अधिकृत प्रतिनिधी उपलब्ध नसल्याने ग्राहकांना आपली तक्रार नोंदविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. समस्या सोडवण्यासाठी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. या विस्कळीत सेवेमुळे त्रस्त झालेले अनेक ग्राहक आता इतर कंपन्यांच्या नेटवर्ककडे (पोर्टिंग) वळण्याच्या तयारीत आहेत. एअरटेलच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कुंडलवाडी परिसरातील नेटवर्क सेवा तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

COMMENTS