Homeताज्या बातम्या

बीडच्या जिरेवाडीत अज्ञातांकडून कथित जादूटोण्याचा प्रकार; वारंवार संशयास्पद साहित्य आढळल्याने कुटुंबात भीतीचे वातावरण

बीड : तालुक्यातील जिरेवाडी येथे एका कुटुंबाच्या मालकीच्या जागेत अज्ञात व्यक्तीकडून वारंवार कथित जादूटोण्याचे संशयास्पद साहित्य टाकले जात असल्याचा

इमामपूर रोडवरील डोंगर भागात अनधिकृत उत्खननावर महसूलची धडक कारवाई; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दोन हायवा केले जप्त
माहूरच्या महासती अनुसया माता मंदिरात अधिकमासानिमित्त धोंडे जेवण महाप्रसाद उत्साहात संपन्न; हजारो भाविकांची उपस्थिती
नांदेड विधान परिषद निवडणुकीत खळबळ; नगरसेवकांचे ‘किडनॅपिंग’ करून घोडेबाजारी? अपक्ष उमेदवार प्रशांत इंगोले यांचा प्रस्थापितांवर गंभीर आरोप

बीड : तालुक्यातील जिरेवाडी येथे एका कुटुंबाच्या मालकीच्या जागेत अज्ञात व्यक्तीकडून वारंवार कथित जादूटोण्याचे संशयास्पद साहित्य टाकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विचित्र प्रकारामुळे संबंधित कुटुंबात प्रचंड भीतीचे व मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातही उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिरेवाडी येथील रहिवासी महादेव निर्धार यांच्या मालकीच्या जागेत गेल्या काही आठवड्यांपासून दर सातत्याने लाल कापडात बांधलेले गाठोडे, लिंबू, सुया, दोरे तसेच इतर संशयास्पद साहित्य आढळून येत होते. हा प्रकार वारंवार घडत असल्याने कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. अखेर महादेव निर्धार यांनी आपल्या मित्रमंडळींसह जागेची कसून पाहणी केली आणि तिथे आढळलेले सर्व संशयास्पद साहित्य गोळा करून नष्ट केले. मात्र, हे साहित्य नेमके कोण, कधी आणि कोणत्या उद्देशाने टाकत आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

स्थानिक नागरिकांच्या मते, अशा प्रकारांमागे केवळ अंधश्रद्धा पसरविणे, भीतीचे साम्राज्य निर्माण करणे किंवा वैयक्तिक द्वेषातून मानसिक त्रास देण्याचा विकृत हेतू असू शकतो. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर अंंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. नागरिकांनी अशा कथित जादूटोण्याच्या प्रकारांना घाबरून न जाता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

COMMENTS