Homeताज्या बातम्या

ठाणेदार होताच औटे यांचा ‘सिंघम’ अवतार; भोकरमध्ये अवैध दारू व मटका व्यवसायावर धडक कारवाई, ५ आरोपींवर गुन्हे दाखल

भोकर : भोकर शहर व तालुक्यात अवैध दारू विक्री, मटका जुगार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतीच भोकर

नांदेडमध्ये निळा महासागर उसळला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
कर्जाच्या दलदलीत अडकलेली नांदेड महापालिका; विकासाचे स्वप्न की आर्थिक दिवाळखोरीची चाहूल?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ.आनंदराव  बोंढारकर यांनी घेतली सदिच्छा भेट
अवैध धंदे बंद करा म्हणाराच दारू विकताना पकडला Nanded Marathi News | He was  caught selling liquor saying stop illegal trade | Latest Nanded News at  Lokmat.com

भोकर : भोकर शहर व तालुक्यात अवैध दारू विक्री, मटका जुगार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतीच भोकर पोलीस ठाण्याची धुरा स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) शैलेंद्र एस. औटे यांनी पदभार स्वीकारताच धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत विविध ठिकाणी छापे टाकून अवैध दारू आणि कल्याण मटका जुगार चालविणाऱ्या ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ४ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून भोकर आणि ग्रामीण भागात अवैध व्यवसायांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकत देशी दारूच्या २८ बाटल्या, मटका जुगारातील रोख रक्कम, मटका चिठ्ठ्या आणि मोबाईल फोन असा एकूण ७ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत रोहित रावसाहेब नरोटे (रा. निमगाव, ता. अर्धापूर), मोहन शंकर आडे (रा. धारजणी कुंडला तांडा), ज्ञानेश्वर अर्जुन मोकके (रा. फुलेनगर, भोकर), आनंद दत्ता वाघमारे (रा. महात्मा फुलेनगर, भोकर) आणि शेख जब्बार (रा. शरीफ टेकडी, भोकर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हा क्रमांक २९४/२०२६ व २९५/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अंतर्गत, तर गुन्हा क्रमांक २९६/२०२६ व २९७/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत ही कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शैलेंद्र औटे व त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली.

COMMENTS