Homeताज्या बातम्या

श्री विशालजी महारगुडे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान

बीड जिल्ह्याचे सुपुत्र व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री विशालजी महारगुडे यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल समर्थ बहुउद्देश

समृद्धी महामार्गावर ट्रकच्या धडकेत 7 कामगारांचा मृत्यू; जालन्याजवळील घटना, 3 जण गंभीर जखमी
प्रकल्प स्पर्धेतून विद्यार्थ्यांना नवसंशोधनाची संधी : उपसचिव देवेंद्र दंडगव्हाळ
नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के 4.7 रिश्टर तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण



बीड जिल्ह्याचे सुपुत्र व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री विशालजी महारगुडे यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, चिखली (जि. बुलढाणा) यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
विशाल महारगुडे हे अनेक वर्षांपासून शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्यरत असून त्यांना कर्नाटकातील धारवाड येथील ख्यातनाम गुरुवर्य पद्मश्री डॉ. पं. कैवल्यकुमार गुरव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या सुरेल आणि अभ्यासपूर्ण गायकीच्या जोरावर त्यांनी राज्यासह देशातील विविध ठिकाणी शास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महारगुडे यांच्या गायकीची खासियत म्हणजे बडा ख्यालातील स्वरांचा देखणा आविष्कार, शांत आणि प्रभावी आलाप, तसेच बढतीतील सुरेल स्वररचना. ठुमरी, झुला, तराना, नाट्यपद आणि अभंग यांसारख्या विविध गायनप्रकारांमधून ते रसिकांना मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या सादरीकरणातील भावपूर्णता आणि रियाजाची खोली श्रोत्यांना खिळवून ठेवते. आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि बीडसह कर्नाटकातील धारवाड, हुबळी, बेंगळुरू, मंगळुरू आणि कदगाव येथे अनेक यशस्वी मैफिली सादर केल्या आहेत. तसेच बीड आकाशवाणी, छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी आणि मंगळुरू आकाशवाणी केंद्रांवरूनही त्यांच्या गायनाचे प्रसारण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर, रसिक आणि शुभेच्छुकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील संगीत प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. बीड जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणार्‍या या सन्मानामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

COMMENTS