Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर ट्रकच्या धडकेत 7 कामगारांचा मृत्यू; जालन्याजवळील घटना, 3 जण गंभीर जखमी

जालना : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा आणि वेगाच्या अतिरेकाचा थरकाप उडवणारा परिणाम पाहायला मिळाला. जालना जिल्ह्यातील जामनेर-कडवंच

संभाजीनगरमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणीची भरदिवसा हत्या
ऋषिकेश गोल्हार यांच्या ‘रानोबाचा माळ’ या कादंबरीला ‘कला गंगा’ पुरस्कार
रस्त्याच्या कामासाठी खंडणीची मागणी

जालना : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा आणि वेगाच्या अतिरेकाचा थरकाप उडवणारा परिणाम पाहायला मिळाला. जालना जिल्ह्यातील जामनेर-कडवंची परिसरात सायंकाळी सुमारास झालेल्या भीषण अपघातात सात महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर गवत काढण्याचे काम सुरू होते. त्यासाठी महिला कामगार आल्या होत्या. या कामगारांची पिकअप व्हॅन जामवाडी शिवारात थांबली होती. तेव्हा नागपूरहून आलेल्या आणि मुंबईला जाणार्‍या ट्रकने या पिकअप व्हॅनला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सात महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावर जेवणाचे डबे, चपला आणि इतर साहित्य व रक्ताचा अक्षरशः सडा पडलेला होता.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. बचावकार्य करताना परिसरात मोठी गर्दी झाली होती. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांमध्ये कडूबाई रामदास मदन, ताराबाई गहीनाजी चौधरी, लक्ष्मीबाई संतोष मदन (केळीगव्हाण), अलका दादाराव आदमाने, मीना परमेश्‍वर आदमाने, कांचन प्रकाश आदमाने (निधोना) यांचा समावेश आहे. उर्वरित मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वी 6 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडजवळ अशाच प्रकारच्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेतही रस्त्याच्या कामावर असलेल्या कामगारांना भरधाव वाहनाने चिरडले होते. त्यामुळे एकाच महिन्यात दोन भीषण अपघात घडल्याने समृद्धी महामार्गावरील कामगारांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासनाने तातडीने व्यवस्था सुरळीत केली. दरम्यान, वारंवार होणार्‍या अपघातांमुळे वाहनांच्या अतिवेगावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. तसेच, महामार्गावर काम करणार्‍या कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा साधने, सूचना फलक आणि वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणण्याची मागणी जोर धरत आहे.

COMMENTS