नगर-कल्याण रोडवर भव्य फटाका मार्केट सुरु

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर-कल्याण रोडवर भव्य फटाका मार्केट सुरु

    नगर - अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्यावतीने भव्य फटाका मार्के नगर- कल्याण रोड येथे सुरु झाले असून, या ठिकाणी उच्च दर्जाचे

संकट काळात प्रामाणिक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज – पद्मश्री पोपटराव पवार.
आमदार काळेंच्या वाढदिवसानिमित्त तळेगांव -मळे येथे वृक्षरोपण.
कर्जत तालुक्यातील पर्यटन विकासासाठी 4 कोटी 25 लाखांचा निधी

    नगर – अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्यावतीने भव्य फटाका मार्के नगर- कल्याण रोड येथे सुरु झाले असून, या ठिकाणी उच्च दर्जाचे व गुणवत्तापूर्ण व विविध नामांकित कंपन्यांचे फॅन्सी फटाके माफक दरात खरेदी करावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

          या फटाका मार्केट विषयी माहिती देतांना सांगितले की, फटाका असोसिएशनच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून नगर-कल्याण रोडवरील भव्य पटांगणात व नियोजनबद्ध असे फटाका मार्केट दरवर्षी प्रमाणे उभरण्यात आले आहे. खात्रीशीर माल व योग्य किंमतीत या ठिकाणी फटाके मिळत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नगरच्या फाटाका मार्केट हे सर्वात मोठे फटाका मार्केट आहे. राज्यभरातून या ठिकाणी ठोक व्यापारी व ग्राहक खरेदीसाठी येत असतात.

          गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करण्यात शासनाच्यावतीने बंदी घालण्यात आली होती. परंतु आता कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाने जवळ-जवळ सर्वच निर्बंध उठविले आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांपासून बाजारपेठ, उद्योग ही व्यवस्थित सुरु झाल्याने आता नागरिकांना महत्वाचा आणि आनंदाचा दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.  इतर गोष्टींबरोबरच आपल्या आनंदात भर टाकण्याचे काम हे फटाक्यातून होत असल्याने यंदाच्या वर्षी मनसोक्त फटाके उडवता येणार आहेत. असोसिएशनच्यावतीने उभारण्यात आलेल्या या फटाका मार्केटमध्ये शिवकाशी व इतर नामांकित ठिकाणीहून चांगल्या प्रतीचे फटाके ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर ध्वनी प्रदुषण, वायू प्रदुषण विरहित फटाकेही या ठिकाणी उपलब्ध असून, लहान मुलांसह, मोठ्यांना वाजवता येतील अशा फटाक्यांचे शेकडो व्हाययटी या ठिकाणी वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सर्व शासकीय नियम पाळून या ठिकाणी फटाक्यांची विक्री जोरात सुरु झाली असून, जिल्ह्यासह, राज्यातील ग्राहक या ठिकाणी येऊन फटाके खरेदी करत आहेत.   पार्किंसह इतरही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य ग्राहकांना सेवा देण्यासाठी तत्पर आहेत, नागरिकांनीही असोसिएशनच्या फटाका मार्केटमधूनच खरेदी करावी. असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.

COMMENTS