नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाची तयारी : मंत्री थोरातांनी केले स्पष्ट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाची तयारी : मंत्री थोरातांनी केले स्पष्ट

अहमदनगर/प्रतिनिधी : आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची तयारी करण्यास सांगितले आहे. अध्यक्षांनी दिलेले आदेश हे पक्षाच

दंत चिकित्सा शिबीराचा 51 रुग्नानी घेतला लाभ
ब्रम्हगावच्या शेतकऱ्याचा अपघात, प्रेत बार्शी पर्यंत नेहले फरफटत l पहा LokNews24
सरपंच परमीटरूम, उपसरपंच हॉटेल नावाला हरकत : किरण अंत्रे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

अहमदनगर/प्रतिनिधी : आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची तयारी करण्यास सांगितले आहे. अध्यक्षांनी दिलेले आदेश हे पक्षाचे धोरण असते. यामुळे जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी करण्यात येत आहे, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे सांगितले. येथील न्यू आर्टस महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी ते नगरला आले होते. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केले असून हे सरकार पडणार असे भाजप पहिल्या दिवसापासून बोलत आहे. मात्र, राज्यातील जनमत हे आघाडी सरकारच्या बाजूनेच असल्याचा विश्‍वास थोरात यांनी व्यक्त केला.
नगर येथील पक्ष कार्यालयात शनिवारी शिर्डी, अकोला, पारनेर आणि कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. थोरात यांनी शिर्डी, अकोले, पारनेर आणि कर्जतच्या शिष्टमंडळाकडून स्थानिक परिस्थिती समजावून घेतली. प्रत्येक ठिकाणी प्रभाग किती, त्याठिकाणी आरक्षणानुसार उमेदवार आहे का? स्वबळाचा निर्णय अंतिम झाल्यास पूर्ण पॅनल तयार करण्यासाठी आतापासून प्रभागनिहाय उमेदवारांच्या याद्या तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. जिल्ह्यात 4 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सध्या तरी या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या प्रदेश अध्यक्षांच्या सूचना आहेत. त्यादृष्टीने चाचपणी सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, एसटी कर्मचार्‍यांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. यामुळ एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केेले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे विरोधी भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, भाजपचा हा अंदाज या सरकारच्या निर्मितीपासून फोल ठरला आहे. सरकारला दोन वर्षे पूर्ण झालेली असून आजही राज्यात जनमत चाचणी घ्या, जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच दिसेल. महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता ही जनतेची इच्छा असल्याचे मंत्री थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आ. डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे उपस्थित होते.

नवले व साळुंके यांचा सत्कार
जिल्हा बँकेवर स्वीकृत संचालक म्हणून निवड झालेले मधुकर नवले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांचा सत्कार मंत्री थोरात यांनी केला. बँकेच्या कर्जत मतदारसंघातून साळुंके यांचा पराभव अनपेक्षित होता. त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून स्वीकृत संचालक पद काँग्रेसकडे घेण्यात आल्याचे थोरात यांनी सांगितले. बँकेची निवडणूक अवघड वाटत असताना सर्वांचा मेळ घालत सोपी केली, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

COMMENTS