Homeताज्या बातम्या

नांदेड विभागात रेल्वेची धडक विशेष तिकीट तपासणी मोहीम; १,१५५ प्रकरणांमधून ५.८६ लाखांचा महसूल वसूल

नांदेड : प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व नियमबद्ध प्रवासाचा अनुभव देण्यासाठी तसेच विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने दक्षिण मध

नांदेडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ‘निवडक’ भेटींची जोरदार चर्चा; लोकप्रतिनिधींना डावलून गुत्तेदारांशीच जवळीक?
धोंडे जेवणात काँग्रेसच्या अंतर्गत अस्वस्थतेला वाट; संघटनात्मक फेरबदलांवर निष्ठावंतांचा सवाल
थकीत पीक विमा नुकसानभरपाई तात्काळ वितरित करा : आ. बोंढारकर यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
Hazur Sahib Nanded Railway Station Picture & Video Gallery - Railway Enquiry

नांदेड : प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व नियमबद्ध प्रवासाचा अनुभव देण्यासाठी तसेच विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात दि. ९ जून २०२६ रोजी व्यापक विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध रेल्वे स्थानके आणि धावत्या गाड्यांमध्ये सखोल तपासणी करून रेल्वे प्रशासनाने ५ लाख ८६ हजार ४५५ रुपयांचा महसूल वसूल केला आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवास (TWT) करणाऱ्या ८०४ प्रवाशांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ४ लाख ४७ हजार ०१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय अनियमित प्रवास (IRR) करणाऱ्या २४५ प्रवाशांची प्रकरणे नोंदवून त्यांच्याकडून १ लाख २२ हजार ५५० रुपयांचा महसूल मिळवला. तसेच बुक न केलेल्या सामानाच्या (UBL) १०६ प्रकरणांमधून १६ हजार ८९५ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. अशाप्रकारे एकूण १,१५५ प्रकरणांमध्ये ही दंडात्मक कारवाई झाली.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण नांदेड विभागात १५४ तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये तिकीट तपासणी विशेष पथकातील २९ कर्मचारी, स्थानकांवरील स्थिर तपासणीसाठी १२ कर्मचारी आणि गाड्यांमधील स्लीपर श्रेणी तपासणीसाठी ११३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकांनी आरक्षित व अनारक्षित डबे आणि स्थानक परिसरात सखोल तपासणी केली. वैध तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सुव्यवस्थित आणि आरामदायी व्हावा यासाठी अशा मोहिमा भविष्यातही नियमितपणे सुरू राहतील, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

COMMENTS