Homeताज्या बातम्या

बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ गेवराईत महत्त्वपूर्ण बैठकमतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

लातूर-धाराशिव-बीड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद मतदारसंघातील महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ आज गेवराई येथे

चकलांबा येथे भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलची बस सेवा सुरू; पालकांकडून शाळेचे आभार
सोलापूर येथील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी बीडचे कुमार व मुलींचे संघ रवाना
चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन इंगळे यांच्या बदलीची मागणी; अवैध धंद्यांना संरक्षणाचा नागरिकांचा आरोप



लातूर-धाराशिव-बीड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद मतदारसंघातील महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ आज गेवराई येथे महत्त्वपूर्ण मतदार बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक भाजप नेते तथा माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.
या बैठकीला उमेदवार बसवराज पाटील यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, भाजप नेते बाळराजे पवार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्यासह जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा ठरविणे, मतदारांशी संवाद अधिक प्रभावी करण्याच्या रणनीतीवर चर्चा करणे तसेच पक्षाची भूमिका आणि संघटनात्मक तयारी यावर सविस्तर विचारमंथन होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बदामराव पंडित आणि बाळराजे पवार यांनी केले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात असून, महायुतीच्या प्रचार मोहिमेला यामुळे अधिक गती मिळेल, अशी स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

COMMENTS