Homeताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या विमानात तांत्रिक बिघाड; खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून चिंता व्यक्त

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान तांत्रिक अडचण आल्याच्या वृत्ताबाबत चिंता व

पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा सदस्य म्हणून शपथ; पेहराव आणि व्यक्तिमत्त्वाची छाप ठरली चर्चेचा विषय
राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये वाढली अस्वस्थता? ‘मला ४२ वर्षांचा राजकीय अनुभव’ : सुनील तटकरे
डाऊनफॉल नेमका कुणाचा ?
Supriya Sules Concern For Sunetra Pawar Over Flight Glitch | Maharashtra

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान तांत्रिक अडचण आल्याच्या वृत्ताबाबत चिंता व्यक्त करत हवाई प्रवास सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एरणीवर आणला आहे. संबंधित वृत्त खरे असल्यास सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि इतर सहप्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईहून दिल्लीकडे जात असताना सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रवास केलेल्या खाजगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. या बिघाडामुळे उड्डाणाला काही काळ विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली.

त्या म्हणाल्या की, “सुनेत्रा पवार यांनी नेमके त्याच विमानातून प्रवास केला होता की नाही, याची आपल्याला खात्रीलायक माहिती नाही. मात्र, विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाली असेल तर तो अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.” कोणत्याही प्रकारच्या प्रवासी वाहतुकीत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. सुळे यांनी सांगितले की, हवाई वाहतूक सुरक्षेच्या विषयावर त्या सातत्याने संसदेत आवाज उठवत आल्या आहेत. प्रवाशांच्या जीविताशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी कठोर नियम आणि नियमित तपासणी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS