Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा सदस्य म्हणून शपथ; पेहराव आणि व्यक्तिमत्त्वाची छाप ठरली चर्चेचा विषय

नवी दिल्ली : पार्थ पवार यांनी गुरुवारी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचेही लक्ष ला

तटकरे विरूद्ध रोहित पवार वाद उफाळलावर्षा निवासस्थानाचे उंबरठे कोणी झिजवले ?
पीकेची रणनीती अंतिमतः भाजपेतर पक्षांना संपविणारी!
राज्यसभेसाठी नवनीत राणा यांची मोर्चेबांधणी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट

नवी दिल्ली : पार्थ पवार यांनी गुरुवारी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या राज्यसभेतील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. इतर सदस्यांचा शपथविधी आधीच पूर्ण झाल्यानंतर पार्थ पवार कधी शपथ घेणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर त्यांच्या शपथविधीने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
या सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेतले ते त्यांच्या पेहरावाने. पार्थ पवार यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. हा पेहराव दिवंगत अजित पवार यांच्या शैलीची आठवण करून देणारा असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. त्यांच्या बोलण्याच्या ढंगात आणि देहबोलीतही काही प्रमाणात तीच छटा जाणवत असल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदवले. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आहे. अशा परिस्थितीत पार्थ पवारांचा शपथविधी हा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता भावनिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरला. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात होते. दरम्यान, त्यांच्या या नव्या जबाबदारीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. साधेपणातही ठसा उमटवणारा त्यांचा अंदाज आणि अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा देणारा पेहराव यामुळे हा क्षण अनेकांसाठी लक्षवेधी ठरला. या वेळी भारताचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, तसेच विविध पक्षांचे अन्य नेते उपस्थित होते.

COMMENTS