रेल्वेकडे बोठेच्या रहिवासाचे फुटेजच नाहीत,पोलिस अस्वस्थ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वेकडे बोठेच्या रहिवासाचे फुटेजच नाहीत,पोलिस अस्वस्थ

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरेयांच्या हत्येनंतर नगरच्या रेल्वे स्थानकावर 7-8 दिवस राहिल्याचे मुख्य आरोपी बाळबोठेने पोलिसांना सांगितले खरे, पण त्याची खातरजमा करण्यास गेलेल्यापोलिसांच्या पदरी निराशा पडली.

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार
अहमदनगरमध्ये “भीम पहाट” कार्यक्रमाचे आयोजन
कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरेयांच्या हत्येनंतर नगरच्या रेल्वे स्थानकावर 7-8 दिवस राहिल्याचे मुख्य आरोपी बाळबोठेने पोलिसांना सांगितले खरे, पण त्याची खातरजमा करण्यास गेलेल्यापोलिसांच्या पदरी निराशा पडली. रेल्वे प्रशासनाकडे त्या काळातील रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच नाहीत. त्यामुळे पोलिस अस्वस्थ झाले असून, बोठेच्या त्या रहिवासाची खातरजमा आता कशी करायची, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. 

दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याला पोलिसांनी हैदराबादला पकडल्यावर जरे हत्याकांडात त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश झाले होते. त्या काळात त्याने पोलिसांनी काही माहिती दिली होती. जरे यांच्या हत्येनंतर 3 ते 10 डिसेंबर या काळात नगरच्या रेल्वे स्थानकावर राहिल्याचे त्याने सांगितले होते. ते खरे की खोटे, हे पाहण्यासाठी पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली. पण त्यांच्याकडील सीसीटीव्हीच्या डीव्हीआरची कपॅसिटी केवळ 15 दिवसांचे फुटेज ठेवण्याची असल्याने डिसेंबरच्या सुरुवातीच्या काळातील सीसीटीव्ही फुटेज नष्ट झाले आहे. परिणामी, बोठेच्या त्या सांगण्यात तथ्य आहे की नाही, याचा शोधही थांबला आहे. दुसर्‍या कोणत्या मार्गाने बोठेच्या या माहितीची खात्री करता येईल, याचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे.

सहाजणांची झाली चौकशी

फरार असतानाच्या काळात काहीजणांचा बोठेशी संपर्कहोता व त्यांनी त्याला काही मदतही केल्याचे पोलिसांना बोठेकडूनच कळलेहोते, त्यामुळे त्यांना बोलावून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. सोमवारीकेडगावच्या दोघांची चौकशी झाल्यानंतर मंगळवारी आणखी चौघांची पोलिसांनीचौकशी केली. बोठे व त्यांचा कसा संपर्क आला, त्यांनी बोठेलाकशाप्रकारची मदत केली तसेच त्यांच्यातील व बोठेतील संबंध नेमके कसे आहेत,त्यांनी त्याला काय मदत केली, याअनुषंगाने पोलिसांनी त्यांच्याकडून माहितीघेतल्याचे समजते. आणखीही दोन-तीनजणांची नावे पोलिसांना समजली असून, त्यांनाहीपोलिसांनी चौकशीला बोलावले आहे. त्यांच्याकडूनही त्यांचे व बोठेचेसंबंध तसेच त्यांनी बोठेला केलेली मदत, याची माहिती पोलिस घेणार असल्याचेसमजते. दरम्यान, बोठेला मदत करणारांमध्ये काही वकिलांचा समावेश असल्याची चर्चाहोती. पण पोलिसांकडून त्याला दुजोरा मिळू शकला नाही.

तांत्रिक बाबीने ती एक्झिट?

बोठेचा पोलिसांच्या ताब्यातील फोन अचानक अ‍ॅक्टीव्हहोऊन तो क्रमांक अनेक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट होण्याची घटनासोमवारी घड़ल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली होती. पण त्या चौकशीत केवळ तांत्रिक बाबीने तो क्रमांक अनेक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झाल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार व्हॉटसअ‍ॅप चीतशी पॉलिसी आहे व तिच्यानुसार एखादा फोन नंबर सलग तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ व्हॉटस अ‍ॅपवर अ‍ॅक्टीव्ह नसेल तर तो आपोआप ज्या-ज्या ग्रुपमध्ये आहे, तेथून एक्झिट होतो. बोठेच्या त्या फोन क्रमांकाबाबतही असेच घड़ले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. व्हॉटसअ‍ॅप पॉलिसीनुसार तो क्रमांक सलग तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ अ‍ॅक्टीव्ह नसल्याने अनेक ग्रुपमधून तांत्रिक बाबीमुळे एक्झिट झाला असावा, असे पोलिस सांगत आहेत. पण त्याचवेळी, या फोन क्रमांकाबाबत अन्य प्रकारे काही घडले काय, याचीही तपासणी केली जात आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

COMMENTS