Homeताज्या बातम्यामनोरंजन

आलिया भट्टने खरेदी केली आलिशान कार

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या चांगलीच चर्चेत आहे. आलिया भटला नुकताच 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील दमदार अभिनयासाठ

इस्लामपूर पालिका राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजीमुळे ’विकास आघाडी’ रिचार्ज
सीनाचे आवर्तन सोडण्याचे आ. राम शिंदे यांचे आदेश
लव जिहादच्या निषेधार्थ नगरमध्ये रस्ता रोको    

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या चांगलीच चर्चेत आहे. आलिया भटला नुकताच ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आलियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तर दुसरीकडे आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामागचे कारण म्हणजे आलियाने नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आलिशान कार खरेदी केली आहे. ही कार खरेदी करत आलियाने स्वतःलाच गिफ्ट केली आहे. तिच्या या लक्झरी कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलियाच्या या कारची किंमत ऐकून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. आलिया भटच्या आलिशान कार कलेक्शनमध्ये आता आणखी एका कारचा समावेश झाला आहे. आलियाकडे आधीच अनेक महागड्या आणि लक्झरी कार आहेत. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. पापाराझीने आलिया भटच्या नवीन कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आलियाची नवीन कार दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, आलियाने रेंज रोव्हरची ऑटोबायोग्राफी लॉन्ग व्हील बेस ही कार खरेदी केली आहे. आलिया भट्टच्या नवीन कारची किंमत किती ऐकून सर्वांना धक्का बसला आहे. रेंज रोव्हरच्या या नवीन मॉडेलची किंमत 3.81 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की अभिनेत्री आलिया भटने आपल्या नव्याकोऱ्या काळ्या रंगाच्या कारची पूजा देखील केली आहे. तिच्या कारला हार घातल्याचे दिसत आहे. आलिया भटला तिच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावेळी आलियाने संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले ज्यांनी तिला गंगूबाई काठियावाडी साठी कास्ट केले आणि तिच्यात इतकी सुधारणा केली की आज ती राष्ट्रीय पुरस्कार जिंकू शकली. आलियासोबतच अभिनेत्री क्रिती सेनॉनला देखील तिच्या मिमी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

COMMENTS