Homeताज्या बातम्या

‘मुळे’ शाळेच्या ईश्वरीची इस्रो सहलीसाठी निवड

श्रीरामपूर : येथील कै. अनिल दिगंबर मुळे प्राथमिक शाळेच्या ईश्वरी राहुल देवकर हिने राज्यस्तरीय सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत तालुक्यात तृतीय

जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी व बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के
आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचा 7 व्या सत्राचा निकाल 100 टक्केयशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान
कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचा दहावीचा निकाल 80.83 टक्के


श्रीरामपूर : येथील कै. अनिल दिगंबर मुळे प्राथमिक शाळेच्या ईश्वरी राहुल देवकर हिने राज्यस्तरीय सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला. तिची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड झाल्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ईश्वरीने केवळ सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेसह भारत टॅलेंट सर्च परीक्षेतही श्रीरामपूर केंद्रात तृतीय क्रमांक मिळवत दुहेरी यशाला गवसनी घातली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना देठे यांनी सांगितले की, संस्था प्रमुख संजय बापू कुलकर्णी, अध्यक्ष निशांत कुलकर्णी, सचिव सुनिता कुलकर्णी, विश्वस्त संतोष कावले व मधुकर मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा हा परिपाक आहे. विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाले.
ईश्वरीला वर्गशिक्षिका जयश्री क्षिरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ईश्वरीच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालकांनी अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

COMMENTS