Homeताज्या बातम्या

पुण्यातून गुंड आणून नांदगावमध्ये बेदम मारहाण; ‘पोलीस’ लिहिलेली बोलेरो जीप जप्त

कर्जत : पिण्याच्या पाण्याच्या जुन्या वादातून चुलत भावाने पुण्यातून गुंड आणून एका कुटुंबाला घरात घुसून लोखंडी गज आणि लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण क

हळदी कार्यक्रमात दोन गटांत हाणामारीदोन्ही बाजूंनी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
अल्पवयीन मुलास मारहाण  
युवतीसोबत गैरवर्तन; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, संशयित मुलगा ताब्यात
नगर : तरुणाला बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

कर्जत : पिण्याच्या पाण्याच्या जुन्या वादातून चुलत भावाने पुण्यातून गुंड आणून एका कुटुंबाला घरात घुसून लोखंडी गज आणि लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे घडली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली आणि ‘पोलीस’ लिहिलेली एक बोलेरो जीप जप्त केली आहे.

घटनेबाबत माहिती अशी की, नांदगाव येथे दत्तात्रय भिकाजी गायकवाड हे ग्रामपंचायतीच्या बोरवरील पाण्याची टाकी सोडून पाणी घेत असताना चुलत भाऊ बाळासाहेब गायकवाड यांनी त्यांना विरोध केला होता, त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. यानंतर २ तारखेला रात्री सव्वाबाराच्या सुमारास फिर्यादी दत्तात्रय गायकवाड हे घराच्या पडवीत झोपलेले असताना, बोलेरो गाडीतून आलेल्या आरोपींनी “आमच्या हापशाचे पाणी का घेतो?” असे म्हणून लाकडी काठी आणि लोखंडी गजाने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

गायकवाड यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. लोकांना येताना पाहून आरोपी गाडीतून पळून गेले. या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी दत्तात्रय भिकाजी गायकवाड (वय ४५, रा. नांदगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे चुलत भाऊ बाळासाहेब चंद्रर गायकवाड, ताराचंद बाळासाहेब गायकवाड, दत्तात्रय बाळासाहेब गायकवाड, बबई बाळासाहेब गायकवाड आणि पुण्यातून आलेल्या अन्य अज्ञात गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यात वापरलेल्या खाजगी बोलेरो जीपवर ‘पोलीस’ असे लिहिलेले होते. कर्जत पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

COMMENTS