Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा

भाजप नेते अमित शहा यांचा हल्लाबोल

जळगाव ः  महाविकास आघाडीला जनतेशी काही देणे-घेणे नसून, त्यांना आपली घराणेशाही वाचवण्यासाठी ते लढत आहेत. महाविकास आघाडीची तीन चाकांची रिक्षा सध्या

नक्षल्यांना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन… मुख्यमंत्र्यांनी मागितला १२०० कोटींचा निधी
’टेरर फंडिंग’चा धोका दहशतवादाहून मोठा – गृहमंत्री शहा
केंद्रीय मंत्री शहांच्या दौर्‍यात घुसखोरी करणार्‍यास अटक

जळगाव ः  महाविकास आघाडीला जनतेशी काही देणे-घेणे नसून, त्यांना आपली घराणेशाही वाचवण्यासाठी ते लढत आहेत. महाविकास आघाडीची तीन चाकांची रिक्षा सध्या पंक्चर झाली आहे. महाविकास आघाडीतील नेते आपली घराणेशाहीसाठी लढत आहेत, सोनिया गांधींना राहुल यांना पंतप्रधान करायचे आहे. उद्धव ठाकरेंना मुलगा आदित्यला मुख्यमंत्री करायचे आहे. शरद पवारांना मुलगी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. या शरद पवारांनी 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राज्याच्या विकासासाठी नेमकं काय केले, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मंगळवारी केला. जळगाव येथील युवा संसद मेळाव्यात शहा बोलत होते.

राहुल गांधींचे यान 19 वेळा लाँच केले, पण ते अपयशी ठरले, असा चिमटाही त्यांनी काढला. शहा म्हणाले की, सोनिया गांधींना राहुल यांना पंतप्रधान करायचे आहे. उद्धव ठाकरे यांना मुलगा आदित्यला मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जी यांना भाच्याला मुख्यमंत्री करायचे आहे. शरद पवारांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे. मात्र, त्यांना लोकांसाठी काहीही करायचे नाही. प्रत्येकाला स्वतःच्या नातेवाईकांना मोठे करायचे आहे. सामान्यांसाठी आणि तुमच्यासाठी नरेंद्र मोदी आहेत, असा दावाही त्यांनी केला. सोनिया-मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये सातत्याने बॉम्बस्फोट झाले. मात्र, मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन आतंकवाद्यांचा खात्मा केला. दुसर्‍यांदा मोदीजी पंतप्रधान झाले, तेव्हा 370 कलम हटवले. त्यामुळे रक्ताचे पाट वाहतील अशी भीती घातली. मात्र, एकही हल्ला झाला नाही. मोदींनी देशाला सुरक्षित व समृद्धी करण्याचे काम केले. मोदींची गॅरंटी देण्यासाठी मी या ठिकाणी आल्याचे ते म्हणाले. व्होट बँकेच्या लालसेपोटी काँग्रेसने रामलल्लाला झोपडीत ठेवले. तर नरेंद्र मोदींनी राममंदिरांचे भूमिपूजन करून उद्घाटन देखील केले. आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शरद पवार यांनी काय काम केले, हे त्यांनी सांगावे, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या तीनचाकी रिक्षाचे टायर पंक्चर झाले आहे. ही तीन चाकी रिक्षा विकास करू शकते का, असा सवाल शहा यांनी उपस्थितांना केला. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार हे देशाला विकसित करत आहे आणि करतील, असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला.

आगामी निवडणूक आत्मनिर्भर भारतासाठी – आगामी होणार्‍या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करायला मी आलो आहे. तरुण मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की, उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ही निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी ही निवडणूक आहे. पण या गैरसमजात राहू नका. येणारी निवडणूक ही 2047 मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवण्यासाठी आहे. 2047 मध्ये मंचावर खूप कमी लोकं असतील, पण मंचासमोर बसलेले सर्व तरुण सहकारी असतील. ही निवडणूक आपल्यासाठी आहे. ही निवडणूक भारताच्या तरुणांची आणि भारताच्या भविष्यासाठी असल्याचे मत भाजप नेते अमित शहा यांनी व्यक्त केले.  

COMMENTS