Homeताज्या बातम्या

नांदेडच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यासाठी नोडल संस्थेची नियुक्ती प्रक्रिया सुरू; मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा

नांदेड : शहरातील वाहतुकीचा वारंवार निर्माण होणारा प्रश्न आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, आगामी २० वर्षांसाठी शाश्वत गतिशीलता निर्माण करण्यासाठी

वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी;खा. शरद पवारांची भूमिका ; धर्मांध प्रवाहाबाबत केली चिंता व्यक्त
समतेचा रथ आता रोखणार नाही; राजेश घोडेंच्या मातंग क्रांती मोर्चाने बीड दणाणलेउपवर्गीकरण द्या, अन्यथा 2029 ला टांगा पलटी – मुख्यमंत्री फडणवीसांना सत्काराचे निमंत्रण; विरोधकांना रणांगणात येण्याचे आव्हान
देवेंद्र फडणवीस : स्वच्छ प्रतिमेचे आणि पारदर्शक प्रशासनाचे नेतृत्व

नांदेड : शहरातील वाहतुकीचा वारंवार निर्माण होणारा प्रश्न आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, आगामी २० वर्षांसाठी शाश्वत गतिशीलता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या मागणीनुसार ‘सर्वसमावेशक वाहतूक आराखडा’ (Comprehensive Mobility Plan) तयार करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. या संदर्भात राज्याच्या नगरविकास व परिवहन राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी खासदार डॉ. गोपछडे यांना अधिकृत पत्राद्वारे शासन स्तरावर सुरू असलेल्या प्रशासकीय कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे नांदेडमध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नांदेड हे शीख धर्मियांची काशी म्हणून ओळखले जाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण आध्यात्मिक शहर आहे. येथील वाढती वाहने आणि अरुंद रस्ते यांवर पर्याय शोधण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेऊन विशेष प्रस्तावाद्वारे मेट्रो प्रकल्पाची आग्रही मागणी केली होती.

नांदेड शहरात यापूर्वी २००५-०६ मध्ये वाहतूक सर्वेक्षण करण्यात आले होते, मात्र गेल्या दोन दशकांत झालेल्या अमुलाग्र बदलांमुळे नवा मास्टर प्लॅन तयार करणे अनिवार्य झाले आहे. यासाठी नांदेड महानगरपालिकेच्या विनंतीनुसार राज्य सरकारने आता एका नामांकित नोडल संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे. या नोडल संस्थेने आपला सर्वसमावेशक आराखडा सादर केल्यानंतर शहरात मेट्रो रेल्वे प्रणाली उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विकासात्मक धोरणामुळे नांदेडला हा मोठा फायदा होत असल्याचे सांगत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

COMMENTS