अंबाजोगाई : सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी उपलब्ध होते, असे प्रतिपादन ५१ महाराष्ट्र बटालियनचे प्रम

अंबाजोगाई : सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी उपलब्ध होते, असे प्रतिपादन ५१ महाराष्ट्र बटालियनचे प्रमुख कर्नल सुनील रेड्डी यांनी केले.
योगेश्वरी सैनिक स्कूलला मंगळवारी सकाळी दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. या प्रसंगी सुभेदार आशाराम यांची प्रमुख उपस्थिती होती, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य मेजर एस.पी. कुलकर्णी होते. कर्नल रेड्डी म्हणाले की, या संस्थेला ऐतिहासिक परंपरा असून येथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी सर्वांगीण विकास साधतील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात अधिकारी भारतीय सैन्यात दाखल होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य एस.पी. कुलकर्णी यांनी सैनिक स्कूलच्या स्थापनेची माहिती देत भविष्यात शाळेत छात्र सेना विभाग (NCC) सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.
‘एक पेड शहीदों के नाम’ वृक्षारोपण उपक्रम: हुतात्मा शिरीष कुमार यांच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘एक पेड शहीदों के नाम’ या उपक्रमांतर्गत स्कूलच्या प्रांगणात कर्नल सुनील रेड्डी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेत येणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते रोपटे लावण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. कार्यक्रमात कर्नल सुनील रेड्डी व सुभेदार आशाराम यांचा शाल व सेंदूर बियाणे देऊन सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य व्ही.व्ही. कुलकर्णी यांनी आभार मानले.

COMMENTS