Homeदेशक्रीडा

भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी सोएर्ड मारिज्ने

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेदरलँड्सचे अनुभवी प्रशिक्षक सोएर्ड मारिज्ने यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे

रामभाऊ जांभळे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात
मनू भाकरने पटकावले कांस्यपदक
मोदींना हिरोची उपमा… ‘या’ क्रिकेटरने केले कौतुक…

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेदरलँड्सचे अनुभवी प्रशिक्षक सोएर्ड मारिज्ने यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. पाच वर्षांच्या अंतरानंतर ते दुसर्‍यांदा ही जबाबदारी स्वीकारत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मारिज्ने यांचा भारतीय संघासोबतचा पहिला कार्यकाळ 2017 ते 2021 या कालावधीत होता. या काळात भारतीय महिला संघाने टोकियो ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत चौथे स्थान पटकावले होते. ही कामगिरी आजवरची भारताची सर्वोत्तम ऑलिंपिक कामगिरी ठरली. त्या यशामुळे भारतीय महिला हॉकीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली होती.
टोकियो ऑलिंपिकनंतर काही वादग्रस्त कारणांमुळे आणि अंतर्गत मतभेदांमुळे मारिज्ने यांनी संघापासून फारकत घेतली होती. त्यानंतर प्रशिक्षक बदलांचा फटका संघाच्या कामगिरीला बसला. अलीकडेच निराशाजनक निकाल आणि कोचिंगमध्ये हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे हरेंद्र सिंग यांना पद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी आता हॉकी इंडियाने पुन्हा एकदा मारिज्ने यांच्यावर विश्‍वास दाखवला आहे. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना मारिज्ने यांनी भारतात परतल्याचा आनंद व्यक्त केला. साडेचार वर्षांनंतर नव्या उत्साहाने आणि स्पष्ट दृष्टिकोनासह मी ही जबाबदारी स्वीकारत आहे. खेळाडूंना त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार जागतिक स्तरावर कामगिरी करता यावी, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले. मारिज्ने यांच्या पहिल्या कार्यकाळात भारतीय महिला संघाने जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान मिळवले होते. मात्र, त्यानंतर संघाची घसरण सुरू झाली. 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकसाठी संघ पात्र ठरू शकला नाही. गेल्या वर्षी आशिया कपमध्ये रौप्यपदक मिळवले असले तरी, आगामी विश्‍वचषकासाठी थेट पात्रता मिळवण्यात संघ अपयशी ठरला. एलिट एफआयएच प्रो लीगमध्येही संघाला अपेक्षित यश मिळाले नाही.

COMMENTS