Homeताज्या बातम्या

अहमदाबादमध्ये १६६ बांगलादेशी पकडले; गुन्हे शाखेची शहरात मोठी कारवाई

अहमदाबाद : अवैध घुसखोरीविरोधात अहमदाबाद गुन्हे शाखेने (Crime Branch) मोठी कारवाई करत शहरातील तीन भागांतून ३०० हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले आ

राज्यात एटीएसने टाकले छापासत्रदेशविरोधी कारवायांमुळे मुंबई, पुणे, नाशिक, नांदेडमध्ये कारवाई
राष्ट्रीय प्रश्‍नांवर सर्वपक्षीय बैठक बोलवा : खा. शरद पवार
प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध दोषारोप निश्‍चितजुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून न्यायालयीन सुनावणीला प्रारंभ
Ahmedabad police apprehend 166 Bangladeshis for illegal stay

अहमदाबाद : अवैध घुसखोरीविरोधात अहमदाबाद गुन्हे शाखेने (Crime Branch) मोठी कारवाई करत शहरातील तीन भागांतून ३०० हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात यातील १६६ नागरिक बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर इतर संशयितांच्या कागदपत्रांची पडताळणी सध्या सुरू आहे.

२ जूनच्या रात्री राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत अहमदाबाद पोलीस आणि क्राइम ब्रांचने चंदोला, गुलाबनगर आणि खोडियारनगर परिसरात एकाच वेळी छापेमारी केली. ताब्यात घेण्यात आलेल्या या सर्व संशयितांना सध्या क्राइम ब्रांचच्या आवारात (मुख्यालय) ठेवण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे.

COMMENTS