बीड : बीड शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच, इतर नागरी समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यां

बीड : बीड शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच, इतर नागरी समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे केली आहे. यावेळी नगरसेवकांसह पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे, वित्त आयोगाच्या निधीचा नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने वापर करणे, विद्युत विभागातील प्रलंबित कामे पूर्ण करणे, मंजूर विकासकामे तातडीने सुरू करणे, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर उपाययोजना करणे तसेच शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणी दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय, काही व्यक्तींनी नगर परिषदेत अनधिकृतपणे विविध विभागांमध्ये आपल्या माणसांची नियुक्ती केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. अशा प्रकारांमुळे आर्थिक देवाणघेवाण होऊन कामे केली जात असल्याची नागरिकांमध्ये भावना निर्माण होत असल्याने या प्रकारांवर तात्काळ निर्बंध आणून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केली. नगरपालिकेच्या कामकाजात अशा प्रकारच्या अनधिकृत हस्तक्षेपाला आळा घालणे आवश्यक असून भविष्यात अशा प्रकारांना वाव मिळू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस नगरसेवकांसह पालिकेच्या विद्युत, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते. शहरातील मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

COMMENTS