Homeताज्या बातम्या

कर्जत तालुक्यात वादळी पावसाचा तडाखापिकांसह घरांचे मोठे नुकसान; एक गाय दगावली

कर्जत : तालुक्यात ३१ मे रोजी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यातील बर्गेवाडी, खंडाळा, मुळेवाडी, गुरव पिंपरी, रुईघवन, खा

खा. नीलेश लंके यांची प्रकृती बिघडली
अहमद इनामदार यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात  
मोहटादेवी देवस्थानचा पदभार धर्मादाय उपायुक्तांकडे  


कर्जत : तालुक्यात ३१ मे रोजी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यातील बर्गेवाडी, खंडाळा, मुळेवाडी, गुरव पिंपरी, रुईघवन, खांडवी चिंचोली रमजान आळसुंदे व कोपर्डी अशा परिसरातील अकरा घरांची व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 प्राथमिक अहवालानुसार कर्जत तालुक्यातील सहा गावांमधील सुमारे १५१.२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा, आंबा, डाळिंब, टोमॅटो, मिरची, कापूस, बाजरी, भाजीपाला तसेच उन्हाळी  पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले. बर्गेवाडी येथील विठ्ठल शहाजी पिसाळ यांच्या घरावरील पत्रे उडून पप्पू शिवाजी मांडगे यांच्या घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले. बर्गेवाडी येथील सखुबाई दशरथ पिसाळ यांच्या घरावरील पत्रे उडून संभाजी ज्ञानदेव नेटके यांच्या घरावर पडली. यामध्ये जनावरांचा गोठा, तुळशीवृंदावन व शौचालयाचे नुकसान झाले. याच ठिकाणी राहणारे आबा गणपत बरबडे यांच्या घराजवळील झाड घरावर पडून घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच देशमुखवाडी येथील राघू गोविंद दंडे यांच्या घरावरील पत्रे वादळामुळे उडाली, तर बर्गेवाडी येथील आबा गणपत बरबडे यांच्या घराजवळील झाड घरावर कोसळून घराचे नुकसान झाले आहे. दरम्यान, खंडाळा येथे वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला.
आधीच उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे नवे संकट ओढवले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करावे. – आ.रोहित पवार

COMMENTS