Homeताज्या बातम्या

म्हाडाच्या घरांच्या सोडतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; २,६४० सदनिकांसाठी ७५ हजारांहून अधिक अर्ज

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजि

‘अमृत’ संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रात उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन; युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इर्मजन्सी लँडिंग
मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करणार; मंत्री विखे-पाटील यांची घोषणा
MHADA Lottery 2025: म्हाडाच्या २,२६४ घरांची सोडत आज, कसा आणि कुठे पाहाल  रिझल्ट? | MHADA Lottery 2025 Draw for 2264 Houses Today Where and how to  Check Results | Saam Tv News

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या सोडतीसाठी तब्बल ७५,३६६ अर्ज प्राप्त झाले असून प्रति सदनिका सरासरी २८.५४ अर्ज आले आहेत. ही बाब मुंबईकरांचा म्हाडावरील वाढता विश्वास आणि परवडणाऱ्या घरांसाठीची मोठी मागणी अधोरेखित करते.

मुंबई मंडळातर्फे संगणकीय सोडतीच्या प्रक्रियेची अंतिम तयारी पूर्ण करण्यात येत आहे. सध्या विधान परिषद निवडणुकांसाठी लागू असलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर म्हाडाच्या वतीने सोडतीची निश्चित तारीख, वेळ व स्थळ अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे.

COMMENTS