जेजुरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने जेजुरी येथे २५ मे ते २७ मे २०२६ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एकलव्य तायक्व

जेजुरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने जेजुरी येथे २५ मे ते २७ मे २०२६ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचा खेळाडू विराज पिसळ याने उत्कृष्ट कामगिरी करत ५४ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे त्याची आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विराजच्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप ओंबासे, सरचिटणीस गफ्फार पठाण, कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी तसेच उपाध्यक्ष घनश्याम सानप यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
विराजला प्रशिक्षक गणेश वंजारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रँडमास्टर अल्ताफ खान, योगेश बिचीतकर, सचिन मरकड आणि मंगेश अहेर यांनीही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अहिल्यानगरचे अध्यक्ष घनश्याम सानप, सचिव गणेश वंजारे आणि कोषाध्यक्ष धर्मनाथ घोरपडे यांनी विराजच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्याला उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS