Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘वैभवशाली श्रीरामपूर’ सारखी दर्जेदार पुस्तके निर्माण होणे गरजेचे : ह.भ.प. अशोक महाराज गोरे

श्रीरामपूर : डॉ. बाबुराव उपाध्ये आणि डॉ. शिवाजी काळे यांनी संपादित केलेले 'वैभवशाली श्रीरामपूर' हे पुस्तक म्हणजे त्या त्या स्थलकालाचा ऐतिहासिक, स

आश्वी बुद्रुक येथे प्रवरेच्या कृषीदूतांचे उत्साहात स्वागत; शेतकऱ्यांना करणार आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
राजहंस दूध संघात १३५० किलोवॅटचा भव्य सौरऊर्जा प्रकल्प; प्रतिदिन ५,२२० वीज युनिटची होणार निर्मिती – बाळासाहेब थोरात
राज्यात इंधनसाठा मुबलक; शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मंत्री भरणे यांचे आवाहन

श्रीरामपूर : डॉ. बाबुराव उपाध्ये आणि डॉ. शिवाजी काळे यांनी संपादित केलेले ‘वैभवशाली श्रीरामपूर’ हे पुस्तक म्हणजे त्या त्या स्थलकालाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रीय विकासाची नोंद घेणारा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. प्रत्येक शहराचा असा इतिहास जपणारी दर्जेदार पुस्तके निर्माण होणे काळाची गरज आहे, असे मत पिंपरी-चिंचवड येथील ‘दिलासा साहित्य सेवा संघा’चे हितदर्शक आणि ब्रह्मसंप्रदाय संस्थेचे साधक ह.भ.प. अशोक महाराज गोरे यांनी व्यक्त केले.

येथील ‘वाचन संस्कृती प्रतिष्ठान’तर्फे ह.भ.प. अशोक महाराज गोरे यांच्या आध्यात्मिक व साहित्यिक कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आयोजित पुस्तक परिसंवादात ते बोलत होते. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले, तर डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुस्तकाचा सविस्तर परिचय करून दिला.

यावेळी बाबुराव बोर्डे, राजू गोरे, संकेत बोर्डे, बाळासाहेब श्रीमंदिलकर आदींनी या पुस्तकाचे आणि ‘ग्रंथ वाचनालय’ उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी केले होते.

ह.भ.प. अशोक महाराज गोरे पुढे म्हणाले की, “लेखन, वाचन, साहित्य निर्मिती आणि समाजप्रबोधन ही आजच्या काळाची गरज असून डॉ. बाबुराव उपाध्ये यांची साहित्य भक्ती आणि समाजनिती सदैव प्रेरक ठरणारी आहे.” संत गोरा कुंभार आणि संत तुकाराम महाराज यांचे संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दिलासा साहित्य संघातर्फे स्मशानातील कवी संमेलन, उंटावरचे कवी संमेलन, झाडावरचे कवी संमेलन अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. शेवटी गणेशानंद उपाध्ये यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS