Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

जम्मू-काश्मीरमध्ये जमात-ए-इस्लामीच्या ठिकाणांवर एनआयएचे छापे

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कथित राष्ट्रविरोधी आणि फुटीरतावादी हालचालींना पुन्हा चालना दिली जात असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थ

मराठी फलकांचा मुद्दा ऐरणीवर
शालेय परीक्षेत जातीयवाद कोण करतंय ?
भारतात दरवर्षी वायू प्रदुषणामुळे 21 लाख लोकांचा मृत्यू

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कथित राष्ट्रविरोधी आणि फुटीरतावादी हालचालींना पुन्हा चालना दिली जात असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) सोमवारी मोठी कारवाई करत मध्य आणि दक्षिण काश्मीरमधील विविध भागांत छापेमारी केली. प्रतिबंधित जमात-ए-इस्लामीशी संबंधित ठिकाणे आणि काही व्यक्तींच्या निवासस्थानी ही शोधमोहीम राबविण्यात आली.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकांनी जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलांच्या साहाय्याने श्रीनगरमधील लाल बाजार परिसरासह शोपियान जिल्ह्यातील अनेक भागांत एकाच वेळी झडती घेतली. शोपियानमधील जैनपोरा परिसरातील मुलू चित्रगाम येथे एका संशयिताच्या घरावरही छापा टाकण्यात आला. संबंधित व्यक्तीचा जमात-ए-इस्लामीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, तो पूर्वी जिल्हास्तरीय पदावर कार्यरत होता, अशी माहिती समोर आली आहे.

तपास यंत्रणांनी शोपियानमधील इमाम साहेब भागात असलेल्या ‘सिराज-उल-उलूम’ या संस्थेतही तपास आणि कागदपत्रांची पाहणी केली. या संस्थेचे जमात-ए-इस्लामीशी संबंध असण्याची शक्यता तपासली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी विचारधारा आणि भारतविरोधी प्रचार पुन्हा सक्रिय करण्याच्या कथित हालचालींच्या अनुषंगाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संपर्क जाळे आणि संघटनात्मक हालचालींचाही तपास केला जात असल्याचे समजते.

दरम्यान, केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये “जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर” या संघटनेवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (UAPA) पुढील पाच वर्षांसाठी बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या संघटनेवर दहशतवादाला प्रोत्साहन देणे, फुटीरतावादी कारवायांना पाठबळ देणे आणि राष्ट्रविरोधी विचारधारेला खतपाणी घालण्याचे आरोप करण्यात आले आहेत.

COMMENTS