Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पश्‍चिम रेल्वे मार्गावर 29 दिवसांचा मेगाब्लॉक

मुंबई ः पश्‍चिम रेल्वेने प्रवास करणार्‍या मुंबईकरांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण, पश्‍चिम रेल्वेने खार ते गोरेगाव सहाव्या मार

पाथर्डी पूर्व भागात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ऋषिकेश ढाकणे यांनी पाहणी केली
बघता बघता पाण्याच्या प्रवाहासोबत कार थेट कोसळली पुराच्या पाण्यात.
कोल्हे सहकारी कामगार पतपेढीला 46 लाख रूपयांचा नफा

मुंबई ः पश्‍चिम रेल्वेने प्रवास करणार्‍या मुंबईकरांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण, पश्‍चिम रेल्वेने खार ते गोरेगाव सहाव्या मार्गे केसासाठी 29 दिवसांचा मेगा ब्लॉक घोषित केला आहे. 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान लोकलच्या तब्बल 2700 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्‍चिम रेल्वे मार्गाच्या खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या मार्गीकेचे काम अत्यंत वेगात सुरू करण्यात आले आहे. 8.8 किमीचे हे काम 7 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. त्यामुळे मार्गावर 29 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यापैकी सुरुवातीच्या दहा ते बारा दिवस कोणतीही लोकल सेवा रद्द केली जाणार नाही. मात्र, 20 ऑक्टोबरपासून लोकलच्या तब्बल 2700 फेर्‍या रद्द केल्या जातील आणि सुमारे 400 सेवा अंशतः रद्द, शॉर्ट टर्मिनेटेड होतील. लांब पल्ल्याच्या 60 गाड्यांवरही परिणाम होणार आहे. लांब पल्ल्याच्या जवळपास 60 गाड्या रद्द होण्याची शक्यता असून सुमारे 200 गाड्या अंशतः रद्द, शॉर्ट टर्मिनेटेड करण्यात येणार आहेत. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, विशेषत: मुंबई उपनगरी विभागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, त्यांना जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

COMMENTS