Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात भ्रष्टाचारामुळे मोठी अराजकता; काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका; संगमनेरच्या सहकार पंढरीला भेट

संगमनेर : सातत्याने जनतेचे काम, पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा, शुद्ध आचार, विचार आणि व्यवहार असणारे राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जाणत्

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या हत्याकांडाच्या घटना; राहुरीत कर्मचाऱ्याचा तर श्रीरामपूरमध्ये मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून
धोंडा खायला बोलावले नाही म्हणून वकील पत्नीस मारहाण; श्रीरामपूर शहर पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल
कोपरगावात निळवंडेचे पाणी आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच आले; माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांचा दावा

संगमनेर : सातत्याने जनतेचे काम, पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा, शुद्ध आचार, विचार आणि व्यवहार असणारे राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जाणत्या नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. भाजपप्रणित सरकारकडून देशात झालेल्या मोठ्या भ्रष्टाचारामुळे अराजकता वाढीस लागली असून भाजप हे असंतोषाचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत उद्योग समूहाला त्यांनी सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, दुर्गाताई तांबे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे. एका निवडणुकीवर मूल्यमापन होत नाही. इतिहासामध्ये अनेक थोर पुरुषांच्या जीवनातही आलेख खाली-वर झाला आहे, मात्र यानंतरचा येणारा टप्पा मोठा असतो. देशात सध्या देवाधर्माच्या नावावरून जातीय ध्रुवीकरण केले जात असून अर्थव्यवस्थेची मोठी घसरण झाली आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या देशात डिझेल-पेट्रोलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. खरीप पिकाचा हंगाम सुरू होणार आहे, अशा काळात सरकारने शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे; मात्र सरकार काहीही करत नाही.

COMMENTS