Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा

अहमदनगर प्रतिनिधी - मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह गावागावातील मराठा समाजाने उपोषण

 आजी खेळाडूचे पालकत्व स्वीकारण्याचा एक नवीन पायंडा ः प्राचार्य चौरे
अहिल्यानगर : नेहरू मार्केट प्रश्‍नी आयुक्तांच्या भूमिकेला गाळेधारकांचा विरोध
बीडची धग पोहचली राजधानी मुंबईत ; संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत काढला मोर्चा

अहमदनगर प्रतिनिधी – मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह गावागावातील मराठा समाजाने उपोषण सुरू केलं आहे. नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. नेत्यांची वाहने अडवली जात आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. कँडल मार्च निघत आहेत. सार्वजनिक वाहने फोडली जात आहेत. रास्ता रोकोही केला जात आहे. मराठ आंदोलन उग्र होत असतानाच आता यात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी उडी घेतली आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा देतानाच इंदुरीकर महाराज यांनी आजवरचा सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे. निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. इंदुरीकर महाराज यांनी उद्यापासून 5 दिवस कोणतेही कार्यक्रम न करण्याचा आणि कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून इंदुरीकर महाराज यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांचे उद्यापासून ते पाच दिवसापर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द झाले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, इंदुरीकर महाराज हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जालन्याला जाणार की नाही याबाबतची माहिती कळू शकलेली नाही.

COMMENTS