नवी दिल्ली : देशातील सुमारे ३५ ते ४० टक्के वकिलांच्या पदव्या बनावट आहेत. हे लोक खोट्या प्रमाणपत्रांच्या जोरावर न्यायालयांमध्ये वकिली करत आहेत, अस
नवी दिल्ली : देशातील सुमारे ३५ ते ४० टक्के वकिलांच्या पदव्या बनावट आहेत. हे लोक खोट्या प्रमाणपत्रांच्या जोरावर न्यायालयांमध्ये वकिली करत आहेत, असा खळबळजनक दावा बार कौन्सिल ऑफ इंडियाचे (BCI) अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील मनन कुमार मिश्रा यांनी केला आहे. बनावट पदव्या असणाऱ्या वकिलांमुळे निर्माण झालेल्या समस्येची बार कौन्सिलला पूर्ण जाणीव असून यावर आवश्यक पावले उचलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना बीसीआयचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा म्हणाले की, न्यायालयीन परिसरात काळे कोट आणि बँड घालून फिरणारे सुमारे ३५ ते ४० टक्के लोक बनावट आहेत. त्यांच्या पदव्या पूर्णपणे खोट्या आहेत याची बार कौन्सिल ऑफ इंडियाला पूर्ण कल्पना आहे. त्यांनी वकिलीच्या पदव्या कुठेतरी तयार केल्या आहेत किंवा विकत घेतल्या आहेत आणि त्याच बळावर ते न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत.
४० टक्के वकिलांनी पदवी पडताळणीचे अर्जच भरले नाहीत जेव्हा बीसीआयने वकिलांच्या पदव्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू केली, तेव्हा सुमारे ४० टक्के वकिलांनी पडताळणीचे अर्जच भरले नाहीत. त्यामुळे हे ४० टक्के वकील बनावट असण्याचा दाट संशय आहे. ही बाब आपण भारताच्या सरन्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे मनन कुमार मिश्रा यांनी सांगितले.

COMMENTS