Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकरंजनचे संपादक परमेश्वर सोळंके यांचा शाश्वती अर्बनतर्फे सत्कार

माजलगाव । प्रतिनिधीमाजलगाव-बीड येथील लोकरंजन या वृत्तपत्राचे संपादक परमेश्वर सोळंके यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रतिष

शहर वाहतूक पोलिसांच्या भुमिकेमुळे अपघात वाढले – आप्पासाहेब जाधव
Majalgaon : पंचायत समिती सभापतींची पतीचं झाले सभापती…
माजलगावच्या एसबीआय शाखेत दलालांचा सुळसुळाट

माजलगाव । प्रतिनिधी
माजलगाव-बीड येथील लोकरंजन या वृत्तपत्राचे संपादक परमेश्वर सोळंके यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रतिष्ठित मूकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल माजलगाव येथील शाश्वती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकारितेतून समाजातील उपेक्षित, वंचित घटकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडत सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत सोळंके यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक करत शाश्वती अर्बनच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन नंदकुमार हावरगावकर यांच्यासह पत्रकार बाळासाहेब आढागळे, संतोष काटकर, ज्ञानोबा गावडे, कृष्णा थोरात, प्रशांत वारकर, सुरज कुवारे, अभिषेक देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना परमेश्वर सोळंके यांनी, हा सन्मान म्हणजे जबाबदारी असून भविष्यातही पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न कायम राहील, असे मत व्यक्त केले.

COMMENTS