Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

NEET आणि JEE परीक्षा आता एकत्र होणार; पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे देशभरात गदारोळ माजला असताना केंद्र सरकारने आता देशातील परीक्षा पद्धतीत आमूलाग्र ब

नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्की !
स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्ननीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप; शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर तीव्र टीका
नीटप्रमाणेच एमएच-सीईटी परीक्षेत गैरप्रकारकाँगे्रस नेते सचिन सावंतांचा आरोप ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तके उघडावी लागणार; नीट (NEET) पुनर्परीक्षेची  तारीख जाहीर, २१ जूनला होणार पुन्हा परीक्षा - Civic Mirror

नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे देशभरात गदारोळ माजला असताना केंद्र सरकारने आता देशातील परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. अभियांत्रिकी (Engineering) आणि वैद्यकीय (Medical) प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘NEET’ आणि ‘JEE’ या परीक्षा एकत्र करून ‘एकच संयुक्त राष्ट्रीय प्रवेश परीक्षा’ (One Nation, One Exam) घेण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. संसदीय समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहेत.

नीट परीक्षेतील गोंधळानंतर, केंद्र सरकारने इस्रोचे (ISRO) माजी प्रमुख डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (NTA) परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात पदवी प्रवेशासाठी ‘एकच सामायिक परीक्षा’ घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. या नवीन रचनेनुसार, NEET आणि JEE च्या परीक्षा एकाच छताखाली आणल्या जातील. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाखेनुसार वेगवेगळ्या विषयांचे पर्याय असतील.

यावर्षी ३ मे रोजी देशातील आणि परदेशातील ५,५०० हून अधिक केंद्रांवर नीटची परीक्षा झाली होती. तब्बल २२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटीच्या मोठ्या प्रकरणानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. यामुळे देशभरात विद्यार्थी आणि विरोधकांनी तीव्र आंदोलने केली. सध्या या संपूर्ण गैरव्यवहाराचा तपास सुरू आहे. दरम्यान, कडक सुरक्षा व्यवस्थेत आगामी २१ जून रोजी नीटची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार ‘वन नेशन, वन एक्झाम’चा निर्णय कधी घेणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

NEET परीक्षेची फी परत देण्याचा निर्णय

राष्ट्रीय चाचणी केंद्राने (NTA) घेतलेली नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द करण्यात आली. याचा तपास सुरूच असून धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. मात्र, निराश झालेल्या पालक व विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे परत करण्याचा निर्णय ‘नीट’ या संस्थेने घेतला आहे.

नीटने ३ मे रोजी घेतलेली परीक्षा रद्द केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आहे. नीटच्या अधिकृत वेबसाईटवर यासाठी ‘फी रिफंड पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील अनेक विद्यार्थी नेट कॅफे किंवा इतर व्यक्तींच्या खात्यावरून पैसे भरतात. त्यामुळे पैसे चुकीच्या खात्यात जाऊ नयेत म्हणून बँक खात्याची माहिती मागवून घेतली जात आहे.

परीक्षा शुल्क परत मिळवण्यासाठी २७ मे २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) ऑनलाईन पद्धतीने बँक खात्याची अचूक माहिती सादर करणे बंधनकारक आहे. २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हा रिफंड मिळणार आहे. या नवीन परीक्षेसाठी उमेदवारांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

COMMENTS