Homeताज्या बातम्या

हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा ‘सस्पेन्स’ वाढला; गाळे वाटप, नातेवाईकांना लाभ आणि खाजगी शाळेला जागा दिल्याने संताप

नांदेड : हदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तामसा उपबाजार समितीमधील गाळे वाटप प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या संपूर्ण प्

“वृद्धत्व हा गुन्हा नाही; अत्याचाराचा बळी ठरत असलेले ज्येष्ठ नागरिक चिंतेचा विषय” – डॉ. हंसराज वैद्य
तामश्यात केवळ ‘तुकाराम मुंडे’ यांच्या नावाची अफवा; अन्‌ धास्तीने बंद झाली दुकाने व पानटपऱ्या!
नांदेड प्राधिकरण निवडणूक एकतर्फी; प्रबळ प्रतिस्पर्ध्याअभावी नगरसेवकांच्या मतांना अपेक्षित ‘भाव’च मिळेना!
Agricultural Produce Market Committee election Voting begins for four  market committees in Nanded district APMC Election 2023 | APMC Election :  नांदेड जिल्ह्यात चार बाजार समितीसाठी मतदानाला सुरुवात, 70 ...

नांदेड : हदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तामसा उपबाजार समितीमधील गाळे वाटप प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गाळ्यांचे वाटप अधिकृत पद्धतीने झाले की अनधिकृतरीत्या, याबाबत शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, काही मोक्याचे गाळे संचालक मंडळाशी संबंधित नातेवाईक तसेच राजकीय पुढार्‍यांच्या जवळच्या व्यक्तींना खिरापत म्हणून देण्यात आल्याचा आरोप होत आहे. या गाळे वाटपासाठी खुली निविदा प्रक्रिया, लिलाव किंवा कोणते पारदर्शक निकष अवलंबले गेले होते का, याबाबतची कोणतीही माहिती अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही.

याशिवाय बाजार समितीच्या मालकीच्या जागेत एका खाजगी इंग्रजी शाळेला भाडेतत्त्वावर जागा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. शेतकर्‍यांच्या सोयीसाठी आणि कृषी मालाच्या खरेदी-विक्रीसाठी राखीव असलेल्या जागेचा वापर शैक्षणिक संस्थेसाठी कोणत्या नियमांनुसार करू देण्यात आला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी सहकार विभागाने स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी करत काही सजग नागरिकांनी माहिती अधिकाराचा (RTI) आधार घेण्याची तयारी सुरू केली आहे. या वाढत्या ‘सस्पेन्स’मुळे हदगाव व तामसा परिसरातील राजकीय आणि व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS