Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरुड-जंजिरा तीन महिन्यांसाठी पर्यटकांना बंद; मेरीटाईम बोर्डाचा निर्णय

अलीबाग : पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, समुद्राला मोठी उधाणे येतात. किनारपट्टीवर वादळी वारे आणि मोठ्या लाटा उसळत असतात. यामुळे जलप्रवासी वाहतूक

गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन; नायगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
देवेंद्र फडणवीस : तथ्याधारित नेतृत्व शैली!
इराणमधून १० भारतीय खलाशांची सुटका; लवकरच मायदेशी परतणार
Murud Janjira Fort Closed For 3 Months From May 26 | मुरुड जंजिरा किल्ला  पर्यटकांसाठी ३ महिने बंद

अलीबाग : पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, समुद्राला मोठी उधाणे येतात. किनारपट्टीवर वादळी वारे आणि मोठ्या लाटा उसळत असतात. यामुळे जलप्रवासी वाहतूक धोकादायक ठरू शकते ही बाब लक्षात घेऊन मेरीटाईम बोर्डाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मुरुड-जंजिरा हा किल्ला येत्या २६ मे पासून पुढील तीन महिन्यांकरिता पर्यटकांना पाहण्यासाठी बंद केला जाणार आहे.

कोकण किनारपट्टीवर आजही सगळ्यात भक्कम स्थितीत असलेला किल्ला म्हणून मुरुड-जंजिरा ओळखला जातो. राजपुरी खाडीच्या तोंडावर वसलेला हा किल्ला पाहणे म्हणजे पर्यटकांसाठ मोठी पर्वणी असते. २२ एकराच्या बेटावर पसरलेला असून, किल्ल्याची तटबंदी ४० फूट उंच आहे. सिद्धी सरदारांनी १५ व्या ते १६ व्या शतकात या किल्ल्याची बांधणी केली. १९ बुरुज असलेला हा किल्ला आजही ‘अभेद्य किल्ला’ म्हणून ओळखला जातो.

हा किल्ला मराठा, पोर्तुगीज, मुघल आणि सिद्धी संघर्षाचा साक्षीदार राहिला आहे. मराठा साम्राज्याने हा किल्ला जिंकता यावा यासाठी अनेकदा आक्रमणे केली. छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी मुरुड जवळ पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी केली होती. त्यामुळे या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे

COMMENTS