Homeताज्या बातम्यादेश

वन नेशन, वन इलेक्शन जेपीसीची टीम गुजरात दौर्‍यावर

गांधीनगर : वन नेशन-वन इलेक्शनच्या मुद्द्यावर स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने विविध राज्यांचा दौरा करून राजकीय पक्ष आणि अधिकार्‍यांशी सल्ला

टाकीत उतरलेल्या चार सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू
कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही : पंतप्रधान मोदीभारताची ताकद त्याच्या संस्कृती, श्रद्धा आणि विचारांमध्ये
गुजरात-महाराष्ट्र महामार्गावर दोन बसेसचा भीषण अपघात, ७ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी


गांधीनगर : वन नेशन-वन इलेक्शनच्या मुद्द्यावर स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने विविध राज्यांचा दौरा करून राजकीय पक्ष आणि अधिकार्‍यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. समितीचे 39 सदस्य तीन दिवसांसाठी गुजरात दौर्‍यावर आहेत.जेपीसी सदस्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली. वन नेशन-वन इलेक्शनसाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्षपद वकील पीपी चौधरी भूषवत आहेत. यात एकूण 39 सदस्य आहेत, ज्यामध्ये 27 लोकसभा खासदार आणि 12 राज्यसभा खासदारांचा समावेश आहे.

COMMENTS