बीड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा युवा नेते युधाजित दादा पंडित यांनी दि.18 मे रोजी लोटस मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, बीड येथे जाऊन आ

बीड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा युवा नेते युधाजित दादा पंडित यांनी दि.18 मे रोजी लोटस मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, बीड येथे जाऊन आडगाव येथील कैलास महाराज आनंदे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
यावेळी युधाजित दादा पंडित यांनी कैलास महाराजांच्या प्रकृतीविषयी माहिती घेत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित नातेवाईकांशी संवाद साधत धीर देण्याचे काम केले. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अमोल करांडे, मनोज टाक सर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. भेटीदरम्यान सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या युधाजित दादा पंडित यांच्या संवेदनशील भूमिकेचे उपस्थितांनी कौतुक केले.

COMMENTS