Homeताज्या बातम्याअहमदनगर

सोनई पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात कारवाई  

सोनई : सोनई पोलीस ठाण्याने परिसरातील अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत सलग दुसऱ्या दिवशीही कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. अवैध दारू विक्री व

भोंदू गणेश शिंदेंच्या अटकेचे राहुरी तालुक्यात पडसाद
मिरजगाव परिसरात मृतदेह आढळला
जामखेडमध्ये आठ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वाहनासह मुद्देमाल ताब्यात

सोनई : सोनई पोलीस ठाण्याने परिसरातील अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत सलग दुसऱ्या दिवशीही कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. अवैध दारू विक्री व मटका अड्ड्यांवर छापे टाकत पोलिसांनी चार वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.दि. १४ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माका ते पांढरीपुल रोडलगत असलेल्या हॉटेल सचिन शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यावेळी बाबासाहेब काशीनाथ घुले (वय ४८, रा. माका) हे विनापरवाना बेकायदा देशी दारूची विक्री करताना आढळून आले. घटनास्थळावरून ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल योगेश बोरुडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर चांदा येथे किशोर सिताराम केळगंद्रे (वय ६०) हे गावातील पत्र्याच्या टपरीत कल्याण मटका नावाचा हारजीतीचा जुगार खेळताना व चालविताना आढळून आले. पोलिसांनी तेथून ९८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा  दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे करत आहेत.याच कारवाईच्या मालिकेत आदिनाथ नामदेव आढाव (वय ४६, रा. लोहारवाडी) हे गावच्या शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये देशी-विदेशी कंपन्यांची बेकायदा दारू विक्री करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले. घटनास्थळावरून १७६० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निखिल तमनर करीत आहेत.दरम्यान, सोनई गावातील दहाव्याच्या ओट्याजवळ बाबासाहेब कचरू भोसले (वय ४९) हे कल्याण मटका नावाचा हारजीतीचा खेळ खेळविताना आढळले. पोलिसांनी १९० रुपये रोख रक्कम आणि खेळाचे साहित्य जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल निखिल तमनर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक देवीदास आव्हाड करत आहेत.

COMMENTS