Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात अनेकांना नोकरी

लोणी ः लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी येथे सॅन्डोझ फार्मा, मुंबई व  ग्लेनमार्क  फ

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करून योग्य दिशेने मार्गक्रमण करावे – भटनागर
महावितरणची डिजीटलायजेशनकडे वाटचाल
पत्रकारांना खुलासा विचारणे चुकीचे ; जिल्हाधिकारी डॉ. भोसलेंनी घेतली मनपा आयुक्त गोरेंची झाडाझडती

लोणी ः लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी येथे सॅन्डोझ फार्मा, मुंबई व  ग्लेनमार्क  फार्मा, संभाजीनगर  या बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. सोमेश्‍वर मनकर यांनी  सॅन्डोझ फार्मा व  ग्लेनमार्क  फार्मा,  या बहुराष्ट्रीय कंपन्याच्या कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले होते. प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी, व इतर हि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हि संधी उपलब्ध करून दिली होती. सुमारे 37 पदविका व 250 पदवी आणि34 पदव्युत्तमध्ये शिकत असलेल्या  विविध महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी या कॅम्पस मुलाखती मध्ये आपला सहभाग नोंदवला. त्यापैकी  प्रवरा फार्मसी च्या पदुत्तर विभागातील वैभव मुर्तडक या विद्यार्थ्याची निवड  सॅन्डोझ फार्मा मध्ये सुमारे तीन लाख साठ हजार वार्षिक पगारावर उत्पादन विभागात झाली. तसेच तर तीन विद्यार्थी अनुक्रमे शुभम गिरगे, कुशल थोरात, व प्रतीक्षा मुळे यांची निवड  ग्लेनमार्क  फार्मा या कंपनी मध्ये वार्षिक वेतन एच लाख चौवेचाळीस हजार या वरती झाली. सॅन्डोझ फार्मा यांचेतर्फे जालिंदर सागर, सातस्कर व समीर चव्हाण तर ग्लेनमार्क फार्मा, यांच्यामार्फत ज्ञानेश्‍वर गोरे, अमित मांगले, व पवन पवार हे तज्ज्ञ मंडळी मुलाखती साठी महाविद्यालयात आले होते. जालिंदर सागर यांनी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यलाय घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक केले व त्यांना मोलाचे मार्दर्शन केले.

COMMENTS