Homeताज्या बातम्याअहमदनगर

धनगरवाडीत तरुणावर जीवघेणा हल्लासहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर: तालुक्यातील धनगरवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि टनक वस्तूने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धनगरवाडी येथील शिकारे वस्तीवर हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना ही घटना घडली. फिर्यादी सचिन बाबासाहेब शिकारे यांना गावातीलच वैभव हरिभाऊ वाकडे आणि आदित्य हरिभाऊ वाकडे यांनी जुन्या वादातून अडवले. काही वेळातच त्यांचे जेऊर येथील मित्र ओम आढाव, गौरव जरे, कृष्णा तोडमल आणि तुषार वाघ हे अशोक लेलँड गाडीतून त्या ठिकाणी आले.या सर्वांनी मिळून सचिन यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी ओम आढाव याने सचिन यांच्या डोक्यात टनक वस्तूने प्रहार केला, तर इतरांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ‘तुला जिवंत सोडत नाही’ अशी धमकी देऊन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. जखमी तरुणावर शेंडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी करत आहेत.

खरातच्या पत्नीने आर्थिक व्यवहाराशी संबंध नाकारलेराहाता न्यायालयात जामिनासाठी सुनावणीवेळी युक्तीवाद
जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
परळीतील ’त्या’ मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून मित्रांनीच केला खूनस्थानिक गुन्हे शाखे कडून 48 तासांत आरोपी जेरबंद

COMMENTS