एक हजारांहून अधिक जणांचे धर्मांतर

Homeताज्या बातम्या

एक हजारांहून अधिक जणांचे धर्मांतर

एटीएसने सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे.

जनता सहकार्य करेलच, पण त्यांचाही विचार व्हावा : देवेंद्र फडणवीस
पोलिसातील वाघ अखेर पोलिसांच्याच पिंजर्‍यात…; अत्याचाराच्या गुन्ह्यात निलंबित पोलिस निरीक्षक वाघला पोलिस कोठडी
शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा

लखनऊ : एटीएसने सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे. मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम हे दोघे दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात राहतात. धर्मांतर रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग असून, मूकबधिर मुले आणि महिलांचे धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून एक हजारांपेक्षा जास्त लोकांचे त्यांनी धर्मांतर केले असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे.

नोएडातील मूकबधिर शाळेतील मुलांचेही धर्मांतर त्यांनी केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गोमतीनगर पोलिस ठाण्यात राज्यात लागू करण्यात आलेल्या धर्मांतर विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामिक दवाह केंद्राचे अध्यक्षांचाही एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले, की या रॅकेटला प्रदेशातून पैसा पुरवला जात असल्याचे पुरावे पोलिसांकडे होते. दोघांनाही चौकशी करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. आम्हाला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. यात परदेशातून पुरवल्या जाणार्‍या पैशांसंदर्भातील कागदपत्रांचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दोघांची चौकशी केली. वर्षभरात 250 ते 300 मुलांचे धर्मांतर केले असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांना पैसे आणि नोकरीचे आमिष देऊन हे धर्मांतर करत होते. कल्याणपूर आणि कानपूर येथील दाम्पत्यांच्या मूकबधिर मुलाचे धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर त्याला दक्षिण भारतात पाठण्यात आले. अशी हजारो प्रकरण समोर आली आहेत, असे प्रशांत कुमार म्हणाले.

COMMENTS