Homeताज्या बातम्याअहमदनगर

शेतातील पाइपलाईनच्या कारणावरून वाद; चौघांविरुद्ध गुन्हा 

सोनई : नेवासा तालुक्यातील कोठा परिसरात शेतातील पाइपलाईनच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी भाऊसाहेब काळे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शशिराव रावसाहेब शेंडकर, सोपान रावसाहेब शेंडकर, सौरभ शशिराव शेंडकर व गौरव शशिराव शेंडकर  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटना बुधवारी (दि. १३ मे २०२६) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कोठा येथील आरोपींच्या घरासमोर घडली. फिर्यादी हे शेतात जात असताना पाइपलाईनच्या कारणावरून आरोपींनी त्यांना जाब विचारला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी लाकडी दांडे, लोखंडी गज व लोखंडी पाईपसदृश वस्तूंचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या घटनेनंतर फिर्यादी यांनी रात्री सोनई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

ट्युशन परिसरात गुंडगिरीचा थरार; बारावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्लालातूरमध्ये उपचार सुरू; प्रकृती चिंताजनक, तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
आनंदगाव बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: माजलगाव न्यायालयाकडून आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
सडे येथे घरगुती वादातून मारहाण; एकाचा मृत्यू

COMMENTS